
मी CBI अधिकारी बोलतोय …”, वृद्ध 86 वर्षीय महिला दोन महिने डिजिटल अँरेस्ट , 20कोटी रूपये लुटले
मुंबई ,
दि.20/3/25.
गेल्या काही काळापासून ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. केंद्र सरकारकडून सातत्याने यासंदर्भात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जातोय. दरम्यान, मुंबईतून अशाप्रकारचे प्रकरण समोर आले आहे. एका 86 वर्षीय महिला दोन महिने डिजिटल अरेस्टमध्ये ठेवून 20 कोटी रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘सीबीआय’ अधिकारी असल्याचे भासवत 26 डिसेंबर 2024 ते 3 मार्च 2025 दरम्यान महिलेची फसवणूक केली.