गडचिरोली वनविभागाकडून प्रधान सचिवांच्या आदेशाची होत आहे पायमल्ली!
कावळे दाम्पत्यानी पुकारले धरणे आंदोलन!

गडचिरोली वनविभागाकडून प्रधान सचिवांच्या आदेशाची होत आहे पायमल्ली!
कावळे दाम्पत्यानी पुकारले धरणे आंदोलन!
गडचिरोली.,
दि १३ फेब्रु 2025
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम
गडचिरोली जिल्ह्यातील अती दुर्गम भागातील कसनसूर वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन होत असताना. व सदर प्रकरण प्रशासनाच्या निदर्शनात येत असताना सबंधित वनप्रशासनाने आतापर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई न केल्यामुळे निष्क्रिय, व सुस्त वनप्रशासनाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते मुकेश वामन कावळे आणि त्यांच्या पत्नीने 13 फेब्रुवारी पासून गडचिरोली वन कार्यालयाच्या पुढे धरणे आंदोलन सुरू करून .आंदोलनातून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी सुधा केलेली आहे.
या गंभीर प्रकरणात गुरफुडलेल्या सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी ,उपोषणकर्त्यांनी सबंधित विभागाला वारंवार लेखी तक्रारी,, उपोषण,प्रसंगी स्मरण पत्रेही देण्यात आली असताना सुधा प्रशासनाने
सबंधित वन अधिकाऱ्याला अभय देण्याचा . व त्यांना वाचविण्यासाठी डोळेझाक करताना दिसत आहे.
अखेर त्रस्त झालेल्या कावळे कुटुंबियांनी आपल्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र वन विभागाचे प्रधान सचिव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली संपूर्ण व्यथा त्यांच्या पुढें प्रगट केली असता
प्रधान सचिव यांचे निर्देशानुसार, मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली यांना तातडीने दोषींवर तीन दिवसांत कारवाई करण्याचे आदेश देवून सुधा वन
प्रशासनाने प्रधान सचिव यांच्या आदेश्याची पायमली करताना दिसत आहे .
या अगोदर10 ऑक्टोबर 2024 रोजी कावळे दाम्पत्याने मुख्य वनसंरक्षक कार्यालया समोर उपोषनाला बसले असताना प्रशासनाने तीन महिन्यांचे आत सबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले असताना सुधा. आश्वासन देऊन आज चार महिन्यांचा कालावधी लोटला जात असताना सुधा संबंधित विभागांनी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही.उलट प्रशासनाच्या वतीने सदर प्रकरणाकडे डोळे झाक करताना दिसत आहे.
कावळे कुटुंबियांनी आता प्रशासना विरोधात थेट लढा उभारण्याचा निर्णय घेतलेला असून गडचिरोली येथे धरणे आंदोलनाला आजपासूनच
सुरू वात केलेली आहे.
दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन अधिका अधिकं तीव्र, करण्याचा ठाम निर्धार केलेला आहे.