
बोलेरो आणि बसची भीषण टक्कर , भीषण अपघातात महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या 10 भाविकांचा मृत्यू तर 19 जण जखमी…
दि.14 /2/2025.
उत्तर प्रदेश,
उत्तर प्रदेश प्रदेशमधील मिर्झापूर-प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात झाला असून, बोलेरो आणि बसमध्ये धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण जखमी झाले आहेत. बस आणि बोलेरोमधील ही धडक एवढी भीषण होती की त्यात बोलेरोचा चेंदामेंदा झाला.