कोटगल एम.आय. डी. सी.परिसरात सिमेंटविटा तयार करणाऱ्या उत्पादक व्यावसायिकांची चौकशीची मागणी – गुरुदेव भोपये.
कार्यकारी संपादक अनुप मेश्राम

.
कोटगल एम.आय.डी.सी.परिसरात सिमेंटविटा तयार करणाऱ्या उत्पादक व्यावसायिकांची चौकशीची मागणी – गुरुदेव भोपये सामाजिक कार्यकर्ते
कार्यकारी संपादक .
अनुप मेश्राम.
गडचिरोली. दि.१५ फेब्रु,2025.
कोटगल एम.आय.डी.सी. परिसरात काही सिमेंट विटा उत्पादकांनी अनेक दीवसापासून मोठया प्रमणात विटांचा व्यवसाय सुरू केलेला आहे.
सिमेंट विटा उत्पादित करताना सिमेंट,रेती, वाळू,रासायनिक द्रव्ये, चिकनमाती तसेच पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर व सोबत लागणाऱ्या अनेक साहित्यांची अतिशय आवश्यकता असताना सुधा सिमेंटविटा उत्पादक नियमाने ठरवून दिलेल्या प्रमाणित साहित्याचा कधीच वापर करताना दिसत नाही.
फक्त सिमेंट व बुकटी पावडरचा वापर करून निकृष्ट ,कमकुवत व पोकळ स्वरूपाच्या विटा तयार करून बाजारात बेभावाणे विक्री करून ग्राहकांची फसगत व दिशाभूल करताना दिसत आहेत.
तसेच सिमेंटविटा उत्पादित करताना धूर, धुळ, ड्रेनेज या सारखे टाकाऊ पदार्थ तयार होत होत असून बाहेरील वातावरणात वावरणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत असून वीटा उत्पादक व्यवसायांकानी पर्यावरणाची खरोखर मंजुरी घेतली काय ,?
तसेच सिमेंटविटा कारखान्यात काम करीत असलेल्या कामगारांच्या आरोग्याची त्यांची हिशोब पुस्तके,व कागदपत्रे भविष जीवनविमा या बाबतची तपासणी करन्यांची.तसेच सिमेंट विटा तयार करताना कामगारांना बूट, हातमोझे कंटनेर या सारख्या आवश्यक वस्तु देण्यात येते काय? यांही वस्तूची चौकशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गुरुदेव भोपये यांनी केली आहे.