देश-विदेश
भिषण ! महाकुंभमध्ये पुन्हा एकदा अग्नीतांडव ; सेक्टर 18 ,19 मधील अनेक टेंट जळुन खाक..
मुख्य संपादक

भिषण ! महाकुंभमध्ये पुन्हा एकदा अग्नीतांडव ; सेक्टर 18 ,19 मधील अनेक टेंट जळुन खाक..
प्रयागराज
दिनांक 16 /2/2025 .
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील सेक्टर १८ आणि १९ मध्ये भीषण आग लागली आहे. यामध्ये अनेक टेंट जळून खाक झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू झालं आहे. सध्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. तसेच आगीमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.