आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
दुधात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध एफडीए कठोर पाऊल उचलणार, फक्त दंडच नाही तर परवाने सुद्धा रद्द करणार
मुख्य संपादक

दुधात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध एफडीए कठोर पाऊल उचलणार, फक्त दंडच नाही तर परवाने सुद्धा रद्द करणार..
दुधात भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला असून, येणाऱ्या काळात यासंबंधी कारवाईला आणखी वेग येणार असल्याचे दिसत आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात एफडीए अत्यंत सुनियोजित व धडाकेबाज कारवाई करत असून, दूधभेसळ रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलत आहे. १५ जानेवारी २०२५ रोजी दूध सर्वेक्षण मोहिमेमध्ये अप्रमाणित घोषित करण्यात आलेल्या दुधाच्या नमुन्यांबाबत संबंधित सहाय्यक आयुक्त (अन्न) आणि संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ आणि कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.