देश-विदेश
1 महिना , 1 कोटी भाविकाचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात 15 कोटीची महादान ,आकडा रोज वाढतोय ..
मुख्य संपादक

1 महिना , 1 कोटी भाविकाचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात 15 कोटीची महादान ,आकडा रोज वाढतोय ..
अयोध्या ,
दिनांक 16/2/2025.
१४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे अयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांती ते महाशिवरात्री या काळात महाकुंभमेळा होत आहे. महाकुंभमेळा सुरू होऊन जवळपास एक महिना झाला आणि या एका महिन्यात तब्बल ५० कोटींहून अधिक भाविक, पर्यटकांनी या अद्भूत आणि दुर्लभ योगाच्या सोहळ्यात सहभाग नोंदवला. महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केल्यानंतर लाखो भाविक, पर्यटक अयोध्येत जाऊन राम मंदिरात रामललाचे दर्शन घेत आहेत. दररोज हा आकडा वाढतच चालला आहे. केवळ भाविक नाही, तर राम मंदिरात भाविकांकडून देण्यात येणारा आकडाही वाढत चालला आहे.