आरोग्य व शिक्षणमुंबई
NEET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिवाय परदेशातून MBBS करता येणार नाही ,सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ।
मुख्य संपादक

NEET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिवाय परदेशातून MBBS करता येणार नाही ,सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ।
दिनांक 21/2/2025
मुंबई , हाईकोर्ट
लाखो भारतीय विद्यार्थी दरवर्षी NEET ची परीक्षा देऊन MBBS चा प्रवेश मिळवतात. काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परदेशी संस्थेतून MBBS करण्यासाठी NEET UG परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय तो विद्यार्थी परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.