देश-विदेश
नक्षलवादी विरोधी मोहिमेला यश ; 17 नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण, 9 जणांवर होते 24 लाखांचे बक्षीस ।
मुख्य संपादक

नक्षलवादी विरोधी मोहिमेला यश ; 17 नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण, 9 जणांवर होते 24 लाखांचे बक्षीस ।
छत्तीसगढ ,
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचा खात्मा करण्याचा प्रण घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नक्षलवाद्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. तर, या कारवाईला घाबरुन अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणदेखील करत आहेत. याच क्रमाने छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात गुरुवारी 17 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी 9 जणांवर 24 लाख रुपयांचे बक्षीस होते.