हैदराबादमध्ये होळी साजरी करणाऱ्यांवर कडक निर्बंध , “तुम्ही CM की निजाम? “, संतप्त भाजपाचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुख्य संपादक

हैदराबादमध्ये होळी साजरी करणाऱ्यांवर कडक निर्बंध , “तुम्ही CM की निजाम? “, संतप्त भाजपाचा मुख्यमंत्र्यांना सवाल
हैदराबाद,
दि.14/3/25.
तेलंगाणा सरकारने हैदराबाद आणि सायबराबादमध्ये होळी साजरी करताना जबरदस्तीने रंग लावण्यावर आणि गटागटाने वाहनं चालवण्यावर बंदी घातली आहे. शहरात शांतता कायम राहावी यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र भाजपाने याविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली असून, भाजपा आमदार राजा सिंह यांनी सरकारचे हे आदेश म्हणजे तुघलकी फर्मान असल्याचे सांगितले आहे. तसेच तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेंवंत रेड्डी हे नववे निजाम असल्याची टीका त्यांनी केली.
होळीसाठी हैदराबाद पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार १३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून १५ मार्च रोजी संध्याकाळी ६ वारेजपर्यंत रस्त्यांवरून गटागटांनी वाहनं चालवता येणार नाहीत. तसेच कुणावरही जबरदस्तीने रंग टाकण्यास किंवा रंगीत पाणी फेकण्यास मनाई असेल. त्याशिवाय १४ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मद्य आणि ताडीची दुकानं बंद राहतील. मात्र फाईव्ह स्टार हॉटेल आणि क्लबवर बंदी नसेल.