आशा वर्कर यांचा 18 ऑक्टोंबर पासून बेमुदत राजव्यापी संप!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

आशा वर्कर यांचा 18 ऑक्टोंबर पासून बेमुदत राजव्यापी संप!
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
सिरोंचा( दि.18विशेष.प्र.)
सन 2005 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानात गटप्रवर्तन म्हणून कार्यरत असलेल्या आशा वर्कर या 18 वर्षापासून गटप्रवर्तक म्हणून काम करीत आहेत. आज 3500 गटप्रवर्तक कार्यकर्त्यावर सतत अन्याय होताना दिसत आहे .कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी,व मिळणारे लाभ गटप्रवर्तकांना मिळण्यात यावे. तसेच गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे या करिता 18 आक्टोबर पासून गटप्रवर्तकांनी बेमुदत राज्य व्यापी संप करण्याचा संकल्प केलेला आहे.
या राज्य व्यापी संपाला राज्यातील 70000 हजार आशावर्कर यांनी आपला सहभाग दर्शविलेला आहे.या राज्यव्यापी मोर्चाचे नेतृत्व कॅ. विनोद झोडगे जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष यांनी केले आहे.