क्रीडा स्पर्धांमुळे खेळ भावना वृद्धिंगत होण्यास मदत: भाग्यश्री ताई आत्राम यांचे प्रतिपादन
मुख्य संपादक

क्रीडा स्पर्धांमुळे खेळ भावना वृद्धिंगत होण्यास मदत: भाग्यश्री ताई आत्राम यांचे प्रतिपादन
सिरोंचा येथे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन.
सिरोंचा :-
विद्यार्थी दशेत खेळ महत्त्वाचे आहे. खेळामुळे शारीरिक व्यायामासोबतच बौद्धिक विकासालाही हातभार लागतो. नियमित खेळ खेळल्याने खेळभावना वृद्धिंगत होण्यास मदत होते,असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.
सिरोंचा तालुक्यातील तालुकास्तरीय बालक्रीडा, कला व सांस्कृतिक संमेलनाचे उद्घाटन तालुका मुख्यालयातील मॉडेल हायस्कूल येथे त्यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील गटविकास अधिकारी अनिल कुमार पटले, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कुल्लूरी,माजी प स सभापती कृष्णमूर्ती रिकुला,माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष एम डी शानु, नगरसेवक रंजित गागापूरपवार, गटशिक्षणाधिकारी निलकंठम दोंतुला,शिक्षण विस्तार अधिकारी एस जे दुर्गम,एस.बी.टेकुल, सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी म्हणाले की सिरोंचा तालुक्यातील विद्यार्थी खेळामध्ये मागे नाहीत.अनेक स्पर्धांमध्ये येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुण विकसित होण्यासाठी अशा आयोजनाचा मोठा हातभार लागतो. यावर्षीचे आयोजन हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अधिक उत्तम होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक येथील गटशिक्षणाधिकारी नीलकंठम दोंतुला यांनी केले,सूत्रसंचालन शिक्षिका वैष्णवी नन्नावरे तर आभार प्रदर्शन येथील शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर टेकुल यांनी केले.