आदर्श पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवात मारली बाजी
मुख्य संपादक - संतोष मेश्राम

आदर्श पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ,जिल्हास्तरीय युवा महोत्सवात मारली बाजी
आदर्श पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पारितोषिक जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन ।
दिनांक 1/12/2024
गडचिरोली:
जिह्यातील युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली, नेहरू युवा केंद्र गडचिरोली व राष्ट्रीय सेवा योजना, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या महोत्सवात आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे घटक आदर्श पदवी महाविद्यालय गडचिरोली येथील विद्यार्थ्यानी प्रथमच लोकनृत्य, समूह गीत, वक्तृत्व स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांध्ये सहभागी दर्शविले होते. त्यामध्ये कथालेखन मध्ये कु. पूजा नैताम हिला द्वितीय क्रमांक, तसेच समुह गीतासाठी द्वितीय तर लोकनृत्य साठी तृतीय क्रमांक प्राप्त झाला. व स्पर्धेत सहभागी इतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले होते.
या यशाकरिता विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा कारू आणि समन्वयक भरत घेर यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या स्पर्धेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.