गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पदभरती करिता अर्जांचा पाऊस!
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पदभरती करिता अर्जांचा पाऊस!
दणका कायद्याचा
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली.( दि.२९ नोव्हेंबर)
गडचिरोली येथे नव्यानेच अस्तित्व आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये अनेक तरुण बेरोजगारांनी आपले भविष्य घडविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये गेली तीन महिन्यापासून अनेक पदभरती साठी अर्ज देणे सुरू केलेले आहे.
सदर कर्मचाऱ्यांची पदभरती करताना शासकीय महाविद्यालयाने कुठलीही जाहिरात सुधा काढलेली नसल्याचे तरुणांतं बोलले जात आहे.
वैधकीय महाविद्यालयामध्ये जी काही कर्मचाऱ्यांची पद भारती होईल ती पदभरती एका खाजगी कंपनीला दिलेली असून हीच कंपनी पदभरती साठी अर्ज केलेल्या तरुणांचे भविष्य घडवणार असल्याचे चर्चिले जात आहे. जिल्हा स्तरावर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीची वृत्तपत्रातून जाहिरात काढून जिल्ह्यातील अनेक तृणानेंतरची काम करण्याची संधी देण्याची मागणी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व दलित पॅंथरचे जिल्हाध्यक्ष अनुप मेश्राम यांनी केलेली आहे.