
मुहूर्त ठरला ! PM मोदीच्या उपस्थितीत 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार महायुतीची शपथविधी
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुंबई
दिनांक 2/12/2024.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा जनाधार मिळूनही महायुती सत्तास्थापनेसाठी करत असलेला उशीर राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधी कधी होणार, कोण येणार आणि कुठे होणार, याबाबतची घोषणा केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पोस्टमधून बावनकुळे यांनी शपथविधी सोहळ्याविषयी माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.