गडचिरोली प्रिमियर लिग (GPL 2025) – ८ व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा…
मुख्य संपादक ,

गडचिरोली प्रिमियर लिग (GPL 2025) – ८ व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा…
विजयभाऊ वडेट्टीवार फॅन्स क्लब, गडचिरोली आयोजित गडचिरोली प्रिमियर लिग (GPL 2025) किकेट स्पर्धेच्या ८ व्या पर्वाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
गडचिरोली ,
दिनांक 21/01/25.
या उद्घाटन सोहळ्याला मा. विजयभाऊ वडेट्टीवार, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन, लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे, खासदार डॉ. नामदेव किरसान, विधान परिषद आमदार श्री. सुधाकर अडबाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
क्रिकेटच्या मैदानावर गडचिरोलीतील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व खेळातील चमक दाखवण्याची संधी मिळावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. GPL 2025 चा हा नवा हंगाम गडचिरोलीतील तरुणांना नवा आनंद देईल असा विश्वास यावेळी मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.