
तुर्कीमधील कार्तलकाया रिसाँटला भिषण आग ; पर्यटकांनी उड्या मारल्या , 66 जनांचा मुत्यू ।
तुर्की,
दिनांक 22/1/25.
तुर्कीच्या बर्फाच्छादीत प्रदेशातील एका मोठ्या रिसॉर्टला लागलेल्या भीषण आगीत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. खोलीतील हवामान गरम करण्यासाठी असलेल्या प्रणालीमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. वायव्य तुर्कीमधील कार्तलकाया रिसॉर्टला ही आग लागली. आग लागल्याचे समजताच हॉटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांनी खिडक्या, गॅलरीतून चादरींची दोरी करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी आगीमुळे खाली उड्या मारल्या. यामुळे त्यांचा खाली पडून मृत्यू झाला.