
सिरोंचा येथे मा.सा.कन्नमवार यांची जयंती साजरी..
सिरोंचा येथे मा.सा.कन्नमवार यांची जयंती साजरी….
सिरोंचा:महाराष्ट्राचे दुसरे आणि विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय मा.सा. कन्नमवार यांची १२४ वी जयंती सिरोंचा शहरात बेलदार समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली.
स्वर्गीय मा.सा.कन्नमवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विविध कार्यक्रमांनी बेलदार समाज बंधू-भगिनींनी जयंती साजरी केली. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रय्या रालबंडीवार, माजी नगरसेवक रवी रालबंडीवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,पिडगु सत्यम,
श्रीहरी भंडारी, मंदा शंकर, नारायण जवाजी,सतीश जवाजी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी मा सां कन्नमवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकून सविस्तर माहिती दिली.मा सा कन्नमवार यांचे राज्यासाठी आणि समाजासाठी असलेले योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी बेलदार समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.