
विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
सिरोंचा:- तालुक्यातील आसरअली येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी माजी जि प अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.
मागील दोन दिवसांपासून भाग्यश्री ताई आत्राम सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यांच्या आसरअली येथील एका सभेत विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले.यावेळी ताईंनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत केले. यावेळी राकॉ चे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य रवी रालाबंडीवार,गणेश बोधनवार,विजय रंगुवार आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तरुण वर्गाचा समावेश असून त्यांनी महिला आणि तरुण नेतृत्वावर विश्वास असल्याचे मत व्यक्त केले.एकाच गावातील जवळपास वीस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने विविध पक्षांना मोठा धक्का बसला आहे.