अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरहजेरीत सिरोंचा पंचायत समिती कार्यालयात चक्क कुत्र्यांचा वावर! – विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने जनतेला मनस्ताप
मुख्य संपादक

अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरहजेरीत सिरोंचा पंचायत समिती कार्यालयात चक्क कुत्र्यांचा वावर …
विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने जनतेला मनस्ताप.
सिरोंचा
(प्रतिनिधी )दि.25/11/2023 .
जिल्ह्याचा दक्षिण विभागातील शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयाअंतर्गत येणा-या विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या अनियमिततेच्या चर्चा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आल्या आहेत. अशातच सिरोंचा पंस कार्यालयात गट विकास अधिकारी व विविध विभागांचे कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीत चक्क एका कुत्र्याने कार्यालयाचे प्रत्येक विभागात घुसून हैदोस घातल्याचे चित्र निदर्शनास आल्याने पंचायत विभागाच्या निष्क्रियतेची संपूर्ण शहरात खमंग चर्चा रंगली आहे.
दिवाळी निमित्त सरकारी व निमसरकारी कार्यालयांना सलग पाच दिवस सुट्या होत्या. या सुट्यांच्या कालावधीत सर्वच शासकीय कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी सुट्यांवर होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी सार्वजनीक बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या प्रकल्प कार्यालयात अधिका-यांसह कर्मचा-यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यालयीन खुर्च्या रिकाम आढळून आल्या. या कार्यालयीन कर्मचा-यांच्या गैरहजेरीचे प्रकरण ताजेच असतांना तालुका मुख्यालयातीलच पंचायत समिती विभागातील अधिकारी व कर्मचा-यांच्या अनुपस्थितीत चक्क कार्यालयात कुत्र्याने फेरफटका मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतरही पंचायत विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी आपआपल्या गावीच असल्याने शासकीय कार्यालय कर्मचारीविना होते. अशातच एका कुत्र्याने पंचायत समिती कार्यालयात घुसून फेरफटका मारला. कुत्र्याचा शासकीय कार्यालयातील हा धुमाकूळ चर्चेचा विषय ठरला असून गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी पंचायत समिती कार्यालय हे मुख्य केंद्रबिंदू असल्याने या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील अनुउपस्थिती हे चिंतनीय बाब आहे. शासनाने पाच दिवसाचे आठवडा केल्यापासून सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फक्त तीन दिवसच उपस्थित राहत असल्याने येथील अनेक कार्यालये ओसाड पडून राहत आहे, हे विशेष.