आष्टीच्या अनुष्का वाळके ची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये धडक
उपमुख्य संपादक :- स्वप्नील मेश्राम

आष्टीच्या अनुष्का वाळके ची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये धडक !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक
दि. 21 /11/ 2023 .
गडचिरोली .
आष्टी .
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद मुंबई शहर तथा जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 18 नोव्हेंबर 2023 ते 20 नोव्हेंबर 2023 रोजी कामगार कल्याण मंडळ मुंबई यांच्या भव्य पटांगणावर 14 वर्षे वयोगट मुले/मुलींचे धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.त्यामध्ये आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत असलेली वर्ग आठवीचे विद्यार्थी कुमारी अनुष्का कैलास वाळके हिने इंडियन धनुर्विद्या खेळ प्रकारामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करून राष्ट्रीय स्तरावर खेळण्याकरिता स्थान निश्चित केलेले आहे.
तसेच गणेश जागरवार या विद्यार्थ्यांने सुद्धा इंडियन खेळ प्रकारामध्ये ब्रांझ मेडल पटकावले आहे. आष्टी तथा गडचिरोली वासियांसाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे. यानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली हे प्रशांत दोंदल सहाय्यक अधिकारी घनश्याम वरारकर, तालुका क्रीडा अधिकारी नाजूक उईके, तालुका क्रीडा अधिकारी बडकेलवार यांनी कुमारी अनुष्का वाळके हिचे अभिनंदन केलेले आहे. खेलो इंडिया सेंटर आष्टी येथे नियमित सराव करीत असल्याने अनुष्का वाळकेला हे ध्येय सिद्ध करता आले.
तिच्या या यशाचे श्रेय तिने सर्वस्वी डॉक्टर श्याम कोरडे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी यांना दिलेले आहे तसेच क्रीडा शिक्षक सुशील अवसरमोल, रोशन सोळंके,कौमुदी श्रीरामवार, नितेश डोके यांनी सुद्धा तिला वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे.
यानिमित्त वन वैभव शिक्षण संस्था अहेरीचे उपाध्यक्ष आदरणीय बबलू भैया हकीम तसेच शाहीन भाभी हकीम यांनी सुद्धा अनुष्का वाळकेच्या कामगिरीचे खूप खूप अभिनंदन करून कौतुक केले व तिला राष्ट्रीय खेळामध्ये यश संपादन होण्यासाठी शुभ आशीर्वाद दिला. यानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी प्राचार्य शैलेंद्र खराती, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य संजय फुलझेले, पर्यवेक्षक के जी बेस जेष्ठ लिपिक राजूभाऊ पोटवार व समस्त प्राध्यापक वर्ग शिक्षक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अनुष्का वर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे व भविष्यासाठी तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत.