
आष्टी येथे रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या ट्रकला , ट्रक ने दिली जब्बर धडक ..
आष्टी परिसरात अपघाताची मालीका सुरुच,उभ्या ट्रकला ट्रकने दिली धडक, ट्रकचालक जखमी .
आष्टी येथील महाकाली पेट्रोल पंपा जवळील घटना.
दिनांक 4/मे 24.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
गडचिरोली
आष्टी :- शहरापासून गडचिरोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी शहराजवळील महाकाली पेट्रोल पंपाजवळ सि .जी. ०७ बि. के. ४५१५ या क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. सि. जी. ०४ एल.पि.४४२९ या क्रमांकाच्या ट्रकने मागून धडक दिली हि घटना दिनांक ०४ मे रोजी दुपारी ०३ वाजता दरम्यान घडली रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली, या धडकेत ट्रकची कॅबिन चकनाचूर झाली असून सुभाष मेश्राम रा. डोंगरगाव ता. अर्जुनी जिल्हा गोंदिया असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. मागून धडक देणारा ट्रक चालक हा दारू पिऊन असल्याने क्लिनर बालू पुरषोत्तम उके,वय वर्षे १८ हा गाडी चालवित होता हा सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे .मात्र दारुच्या नशेत असलेल्या चालकाचे प्राण बालंबाल बचावले आहेत
चारचाकी वाहन असो की ट्रक याला साधा बेल्ट नसला की आरटीओ तसेच पोलीस विभाग तात्काळ चालान मारतात मात्र सध्या अवजड वाहने व नियम भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई ही नाममात्र होत आहे. आष्टी शहराजवळील महाकाली पेट्रोल पंपाजवळ व आलापल्ली मार्गावरील कोहळे यांच्या पेट्रोल पंपाजवळ नेहमी ट्रकांच्या रांगा लागल्या असतात या दोन्ही पेट्रोल पंपाजवळ सुरजागड लोहप्रकल्पाचे सुरक्षा रक्षक नेहमी गस्तीवर असतात तरी या ट्रकांच्या रांगा कशा लागतात मग सुरक्षा रक्षकांचा काम काय? या वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी रस्त्याच्या कडेला ट्रकस उभेच करू दिले नसते तर हा अपघात घडला नसता अशी चर्चा आष्टी शहरासह परिसरात आहे. या वर्दळीच्या ठिकाणी नियम बाहेर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ट्रकवर कुणाचा आशीर्वाद अशा चर्चांना उधान आले आहे. या जिवघेण्या सुरजागड लोहखप्रकल्पा मुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
या बाबतीत कोन लक्ष घालणार असा यक्ष प्रश्न उपस्थित होतो आहे