
गडचिरोली नगर रचना अधिकारी कार्यालयात दिसतच नाही!
गडचिरोली. ( दि 21 नोव्हेबर )
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम.
गडचिरोली येथील नगररचना कार्यालयामध्ये गेली तीन ते चार वर्षापासुन दडी मारून बसलेल्या. काही भुमफिया यांचा आशीर्वाद पाठीशी घालून निर्भय पणे जगू पाहाणाऱ्या गडचिरोली नगररचना अधिकारी आपल्या तीन चार वर्ष्याच्या कार्यकाळात कार्यालयामध्ये कधीच बसताना दिसत नाही.
नगररचना अधिकारी यांचे वास्तव्य नागपूर शहरात असून. नागपूरवरून नेहमीच येणे जाणे करीत असल्याचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते
.नगररचना अधिकारी कार्यालयामध्ये कधी येतात आणि केव्हा जातात हे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुद्धा कळत नाही. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना विचारले असतात,तम्ही मॅडमशी सपंर्क करा. त्याच तूम्हाला सांगतील असे सांगून व उडवा उडवीचे उत्तरे देऊन कार्यालयात कामानिमित्य आलेल्या प्रत्येक गरजू व्यक्तींना नीरउत्साही करून कार्यालयातून आल्या पावलानी त्यांना परत पाठवीले जाते
आमच्या सदर प्रतिनिधीने गडचिरोली नगररचना कार्यालयामध्ये अनेकदा भेटी दिली असता व कार्यालय कर्मचाऱ्यांचे विचारपूस केली असतात कार्यालयातील कर्मचारी नगररचना अधिकारी यांच्या बद्दल तोंड उघडायला सुद्धा तयार नाही.
.नगररचना अधिकारी आल्या दिवशी फक्त शहरातील भुमफिया धारकांना बोलावून व त्यांच्या सोबत हात मिळविनी करून व त्यांना एन. ए.टी.पी. देऊन सतत त्याचं विषयावर बोलताना दिसतात
एन.ए.टी.पी. च्या माध्यमातून नगर रचना अधिकारी यांनी अमाप माया कमविल्याची शहरात खमंग चर्चेला उधान आलेले आहे.तशी चर्चाही सुरु आहे.
.ज्यांना ज्यांना एन.ए.टी.पी.दिलेली आहे त्या त्या भमाफिया यांच्या एन.ए. टी पी. च्या चौकशी करण्याची मागणी काही जिल्ह्यातील नागरिकात बोलली जात आहे..