Breaking
आरोग्य व शिक्षणआष्टी

ग्रामीण रूग्णालय आष्टी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा..

प्रतिनिधी चामोर्शी आकाश बंडावार

 

ग्रामीण रूग्णालय आष्टी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा…

गडचिरोली 

आष्टी 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज .

 

आज दिनांक 21 जून 2024 रोज शुक्रवार ला ग्रामीण रूग्णालय आष्टी ता. चामॉर्शी जिल्हा गडचिरोली येथे रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांनी योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

 

 

 

 

 

आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणजे योगाच्या फायद्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि जगभरात त्याच्या सरावाचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. 2014 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने औपचारिकपणे त्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्दिष्ट जगभरात योगाभ्यासाच्या अनेक फायद्यांबद्दल जागरुकता वाढवणे आहे . आंतरराष्ट्रीय योग दिनाची स्थापना करणारा मसुदा ठराव भारताने प्रस्तावित केला होता आणि त्याला विक्रमी 175 सदस्य राष्ट्रांनी मान्यता दिली होती.

 

 

 

 

आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रत्येक 21 जून रोजी साजरा केला जातो. त्याची ओळख आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केली होती. मानसिक आरोग्य फिटनेस, मन, शरीर आणि आत्म्याचे शारीरिक आरोग्य फिटनेस प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हे आपल्या शरीराला टवटवीत बनवते आणि आपल्याला शांत ठेवते. योगाचे फायदे सांगण्यात आले तसेच नियमित योगा करणे. अशा प्रकारे योग दीन साजरा करण्यात आला.

 

 

यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऋषिकेश बर्डे, डॉ. प्रशांत दाखडे, डॉ. दामोदर, डॉ. तुरकर मॅडम, डॉ. देवतळे, हेमंत कुळमेथे, मनोज बघमारे, रुपाली राठोड, प्राजक्ता भेंडे, खोब्रागडे मॅडम, आकाश बंडावार, मनीष कस्तुरे, आशा सोनवणे, शुभम खोब्रागडे, उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे