
चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुरजागडचा मालघेऊन जाणारा ट्रक घुसला जंगलात ,जिवीत हाणी टळली
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
गडचिरोली .
आष्टी:-
दिनांक 1/8/24.
येथून जवळच असलेल्या मार्कंडा (कं) गावाजवळ सुरजागळ वरुन माल घेऊन जाणारा ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जंगलात घुसला मात्र जीवीत हाणी टळली आहे.
सुरजागडे लोहखनिज भरून आज दि. १ आँगष्ठ ला आष्टीच्या दिशेने येत असलेला मालवाहू ट्रक क्रं एम एच ४० सी टी १५८५ हा वनविभागाने लावलेल्या बॉरिकेट मुळे ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक जंगलात घुसला प्रसंगावधान राखत चालक लागलीच ट्रक थांबवून पसार झाला अशी माहिती प्राप्त झाली आहे.
सुरजागड लोहप्रकल्प सुरू झाले तेव्हा पासून आल्लापल्ली ते
आष्टी पर्यंत रोडवरील अपघाताला निमंत्रणात आणण्यासाठी सेक्युरीटी ची नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी अधिकारी वाहनाने नेहमी फिरत असतात तरीही अशा चुका होतांना दिसत आहे.
मग फिरणारे अधिकारी आपले कर्तव्य बरोबर बजावतात की फक्त रोडवरुन चारचाकी वाहनाने मजा मारतात असा प्रश्न सामान्य नागरिक चर्चेतून करीत आहेत.