आरोग्य व शिक्षणदेश-विदेश
मित्राचे चँलेंज स्विकारुन मारल्या 2000 दंड बैठका; किडणी बंद झाल्याने पोहोचला रुग्णालयात…
मुख्य संपादक

मित्राचे चँलेंज स्विकारुन मारल्या 2000 दंड बैठका; किडणी बंद झाल्याने पोहोचला रुग्णालयात…
रशिया
दिनांक 26/3/25.
रशियातील व्लादिवोस्तोक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 21 वर्षीय तरुणाने आपल्या मित्रासोबत 2000 स्क्वॅट्स (दंडबैठका) मारण्यासाठी 20 हजार रुबलची चॅलेंज लावली होती. यानंतर, या तरुणाने खरोखरच 2000 दंडबैठका मारल्या आणि चॅलेंज जिंकली. मात्र त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला वेदना जाणवू लागल्या. या वेदना आपोआपच थांबतील, असे या तरुणाला वाटले. मात्र चौथ्या दिवशी या तरुणाची प्रकृती आणखीनच खालावली. यानंतर तो थेट रुग्णालयात पोहोचला. तेथे त्याची तपासणी करण्यात आली. यात त्याच्या किडनीने काम करणे बंद केल्याचे आढळून आले. यानंतर, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.