
आणखी एक पिकअपला सुरजागड ट्रकने दिली धडक, तीन जखमी…
पिकअपला वाहनाला सुरजागडच्या मालवाहू ट्रकने दिली धडक, तीन जखमी,
सुरजागडच्या मालवाहू वाहनाची अपघातांची मालिका सुरूच.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली
आष्टी : ३ मे :- गडचिरोलीतल्या जीवघेण्या सुरजागड प्रकल्पामुळे आणखी एक अपघात झाला आहे. सुरजागड येथील खाणीतून लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने पिकअपला धडक दिली या धडकेत तीन इसम गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना दिनांक ३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
पिक अप वाहन हे अहेरी कडे जात होते समोरुन येणाऱ्या सुरजागडच्या मालवाहू ट्रकने जब्बर धडक दिल्याने सागर चुक्कावार पिकअपचा वाहनचालक गंभीर असून चंदा राजन्ना कडरला, राजन्ना कडरला श्रीनिवास जखमी आहेत या जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .
आष्टी – आल्लापली महामार्गावरील महाकाली मंदिराच्या वळणाच्या समोर हा अपघात घडला. दिनांक २ मे रोजी आष्टी जवळील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाजवळ एका इसमाने आपली दुचाकी सोडून दिल्याने त्या इसमाचा जीव वाचला त्या इसमाची दुचाकी ट्रकमध्ये घुसल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले.