
दोन दुचाकींची सामोरासमोर धडक एक जण जागीच ठार, तीन जखमी.
दोन दुचाकींची समोरासमोर धडक एक जण जागीच ठार,
तीन जखमी
आष्टी येथील को – आपरेटिव्ह बॅंक समोरील घटणा .
गडचिरोली
आष्टी:-
दिनांक 3/5/24.
दोन दुचाकींची आमोरासमोर धडक बसल्याने एक दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 3 मे शुक्रवारी संध्याकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास आष्टी येथे घडली.
अमोल रोहणकर वय 28 वर्ष रा. किष्टापुर ता. चामोर्शी असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे.
मृत अमोल रोहणकर हा लग्न समारंभात राळापेठ येथे गेला होता कार्यक्रम आटोपून आपली दुचाकी क्र एम एच ३३झेड १०२८ ने तो परत किष्ठापूर आपल्या स्वगावाकडे जात असताना आष्टी – चामोर्शी मार्गावरील को -ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर अनखोडा येथुन येत असलेल्या दुचाकी क्र एम एच ३३झेड ००३४ या दुचाकीस्वाराला समोरासमोर जबर धडक दिली यात अमोल रोहणकर याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकी वरील व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत जखमींमध्ये सागर दुर्गे वय २३ रा. अनखोडा , गुलचंद दुर्गे वय १४, वंश दुर्गे वय १२ दोन्ही रा. छल्लेवाडा ता अहेरी असे नावे आहेत.
घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटना स्थळी दाखल झाले व मृतकाला आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे