वैनगंगा नदीत नाव उलटून मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना शासनाकडून भरघोस मदत द्या, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन
मुख्य संपादक

वैनगंगा नदीत नाव उलटून मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना शासनाकडून भरघोस मदत द्या, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन ..
गडचिरोली :-
गणपुर
दि.24 जाने. 24
गडचिरोली जिल्ह्यातील तरुण, महीला, पुरुष व युवा वर्ग पोटासाठी इतरत्र दुसऱ्या जिल्ह्यात व राज्यात कामे करण्यासाठी जात असतात. अशातच चामोर्शी तालुक्यातील गणपुर येथील महीला आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी काही महीला मजूर महाकाय वैनगंगा नदी पार करून मिरची तोडायला चंद्रपूर जिल्ह्यातील देवटोक या भागाकडे जात असताना सहा महिलांना नदीच्या पाण्यात आपला जीव गमवावा लागला.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धावाधाव करत संबंधित विभागालाही माहिती दिली. त्यातच शोधमोहीम सुरू केले असता, सहा पैकी तीन महिलांचा शोध घेता आला. यामध्ये शोध लागलेल्या तीन महिलांचा पार्थिवावर आज दि २४ जानेवारी रोजी अंतिम संस्कार करण्यात आले.या अंत्यविधीला महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी भेट देऊन सांत्वन करत दिवस भर वैनगंगा नदीच्या अंत्यविधी स्थळी उपस्थित होते. यावेळी मृतकांच्या कुटुंबीयाला शासनाने भरघोस मदत करावी अशी मागणीही माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी केले आहे.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे प्रभाकर वासेकर, चामोर्शी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष निकेश गद्देवार आदी हजारोच्या संख्येने शोककुल उपस्थित होते.