वैनगंगा नदी पात्रात नाव उलटून मृत पावलेल्या इसमांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत
मुख्य संपादक

वैनगंगा नदी पात्रात नाव उलटून मृत पावलेल्या इसमांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत.
गडचिरोली
चामोर्शी :- वैनगंगा नदीच्या पाण्यात नाव उलटून सहा महिलांना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 23 जानेवारी मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपुर रै. नदीवर घडली होती या घटनेमुळे संपूर्ण गावात शोकाकुड पसरली असून ही घटना संपूर्ण जिल्ह्यात बहुचर्ची ठरली आहे.
प्रेत मिळालेल्या ३ कुटुंबीयांना जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात शासकीय मदत म्हणून नैसर्गिक आपत्ती निधीतून ४ लाख रुपये धनादेश मृतकांच्या कुटुंबीयांना दि.24 जाने 2024 ला वाटप करण्यात आले.
मृत्तक इसमांची नावे.१) पुष्पाबाई मुक्तेश्वर झाडे
२) रेवता हरिचंद्र झाडे
३) जिजाबाई दादाजी राऊत सर्व राहणार गणपुर. चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी गणपुर येथील सरपंच सुधाकर गद्दे, उपसरपंच जीवन भोयर, माजी. पंचायत समिती सदस्य परसोडे, मंडळ अधिकारी येनापुर नवनाथ अतकरे, सुधीर बाविस्कर तलाठी, मंगेश पेंदोर कोतवाल, व गावातील नागरिक उपस्थित होते.