Breaking
गडचिरोलीगणपुर

अवैध वाळू तस्करी करणाऱ्या गणपुर घाटावर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाची धाड

वाळू तस्करी करणाऱ्या चार ट्रकटर जप्त ..

 

 

अवैध वाळू तस्करी करणाऱ्या गणपुर घाटावर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाची धाड…

वाळू तस्करी करणाऱ्या चार ट्रँकटर जप्त ..

गडचिरोली//  चामोर्शी .

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

दिनांक  . 16/4/24.

 

 

गडचिरोली .

 

: जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील गणपूर घाटावर अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने काल जिल्हा भरारी पथकाने जप्त केली आहेत. अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचे मार्गदर्शनात जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री बर्डे, मंडळ अधिकारी नवनाथ अतकरे, तलाठी सुधीर बाविस्कर यांच्या पथकाने निवडणुकीच्या व्यस्त कामातही ही कारवाई केली.

जप्त करण्यात आलेल्या चारही वाहने ट्रॅक्टर असून चालक गणेश यशवंत वार, भारत राऊत, सुभाष मंढरे आणि सचिन राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जिल्हयात मागील वित्तीय वर्षात 172 वाहन जप्त करण्यात येवून त्यातील 248 प्रकरणात 2 कोटी 61 लाख रुपये दंड आकारण्यात आला होता, त्यापैकी 1 कोटी 39 लक्ष रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

जिल्हयात इंदिरा घरकुल योजना, पंतप्रधान घरकुल योजना व रमाई घरकुल योजने अंतर्गंत दुर्बल घटकातील लोकांना मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामासाठी 5 ब्रास पर्यंत रेती विना मुल्य उपलब्ध करुन देणेसाठी जिल्हयातील आमगांव, (ता. चामोर्शी), थुटेबोडी व वैरागड (ता. आरमोरी), चोप (ता. देसाईगंज) नगरम-1 (ता. सिरोंचा) या रेती घाटांमधून रेती उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र सदर घाटावरुन प्रत्यक्ष बांधकामाचे ठिकाणी रेती वाहतूक करणे खर्चीक ठरत असल्याने गावालगतच्या रेती उपलब्ध असलेल्या नदी-नाल्यातून 5 ब्रास रेती उपलब्ध करुन देण्या साठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. तहसिलदार व संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे संयुक्त स्वाक्षरीने गावालगत उपलब्ध नदी-नाल्यांचे प्रस्ताव दिनांक 30 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आज दिले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे