देश-विदेश
अमेरीका – चिन विमानाचा पायलट पासपोर्ट विसरला ; 2 तासानी लक्षात आले , प्रशांत महासागरातुन मागे फिरला
मुख्य संपादक

अमेरीका – चिन विमानाचा पायलट पासपोर्ट विसरला ; 2 तासानी लक्षात आले , प्रशांत महासागरातुन मागे फिरला
अमेरिका ,
विमान प्रवासातील एक गंमतीशीर गोष्ट घडली आहे. सोमवारी अमेरिकेहून चीनला जाण्यासाठी एक प्रवासी विमान निघाले होते. सारे काही वेळेनुसार घडत होते, हवामान साफ होते. अचानक पायलटच्या लक्षात आले, तो पासपोर्टच घरी विसरलाय. मग काय त्याने दोन तासांचे अंतर कापले होते, तिथून त्याने विमान माघारी वळविले. या किस्स्यामुळे चीनच्या सोशल मीडियावर या विसरभोळ्या पायलटला यथेच्छ टीका सहन करावी लागली आहे, आता तो ही गोष्ट आयुष्यभर विसरू शकणार नाही.