डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आक्षेपार्ह लिखाण प्रकरणी बौद्ध बांधवांकडून जाहीर निषेध करत ,शांतीच्या मार्गाने आंदोलन …येनापुर व चित्तरंजनपुर कडकडीत बंद…
आरोपीला अटक केल्याशिवाय गप्प बसणार नाही - बौद्ध अस्मिता रक्षण समीती सर्कल येनापुर व संपूर्ण परीसरातील बौद्ध समाज बांधवांची आक्रमक भुमिका ....
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आक्षेपार्ह लिखाण प्रकरणी बौद्ध बांधवांकडून जाहीर निषेध करत ,शांतीच्या मार्गाने आंदोलन …येनापुर व चित्तरंजनपुर कडकडीत बंद…
आरोपीला अटक केल्याशिवाय गप्प बसणार नाही – बौद्ध अस्मिता रक्षण समीती सर्कल येनापुर व संपूर्ण परीसरातील बौद्ध समाज बांधवांची आक्रमक भुमिका ….
येनापुर .
दिनांक 7/04/2025.
निषेध …..निषेध …निषेध ….
स्थळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येनापुर येथे .
चामोर्शी तालुक्यातील येनापुर वरुन एक कि.मी अंतरावर असलेल्या आंबोली जि.प.प्रा.शाळेच्या सुरक्षित भिंतीवर व किष्टापुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अवमानजनक लिखाण करणाऱ्या अज्ञात आरोपीला अजुनही पोलिसांनी ताब्यात घेतले नसुन जो पर्यंत मुख्य आरोपी शोधून लवकर ताब्यात घेणार नाही, तो पर्यंत बौद्ध अस्मिता रक्षण समिती सर्कल येनापुर स्वस्थ बसणार नाही संपूर्ण परीसरातील बौद्ध बांधव यांनी निषेद ,व पुढे चक्का जाम आंदोलन सुद्धा करणार असल्याचे सांगितले आहे.
मार्गदर्शन करतांना बौद्ध अस्मिता रक्षण समिती चे प्रवक्ते मा मंगलदास चापले

तसेच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही.रँली काढुन येनापुर बंदला पुकार दिला. सकाळी 8 वाजता पासुन तर सायंकाळी 6 वाजता पर्यंत येनापुर व चित्तरंजनपुर कडकडीत बंद ठेवुन परीसरातील सर्व जनतेने सहकार्य केले. यशस्वीरीत्या बंद ला प्रतिसाद मिळाला.आरोपीला पकडण्यात अपयश आल्याने बौद्ध बांधवांचा शांतीच्या मार्गाने आंदोलन …

चामोर्शी : तालुक्यातील आंबोली व किष्टापुर येथे अज्ञात समाज कंठक व्यक्तीने आंबोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षा भिंतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक अश्लिल शब्द व मानवि गुप्तागांचे चित्र काढलेले होते. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन आष्टी येथे दिनांक २६/०३/२०२५ रोजी पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन आष्टी यांना तक्रार (फिर्याद) नोंदविण्यात आलेली होती परंतु पोलीस प्रशाषणाला आरोपीला पकडण्यात अजून पर्यंत यश मिळालेले नाही. म्हणून बौध्द अस्मीता रक्षण समिती येनापुर परीसर व समाविष्ठ असलेले समाज मंडळ यांच्या तर्फे दिनांक ०६/०४/२०२५ ला बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शांन्ततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले. याअगोदर तालुक्यातील सोमनपल्ली येथील बसथांब्यावर अशाच प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानजनक अश्लील शब्दात लिखाण केले होते. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास अटक केली. परंतु पुन्हा आंबोली, किष्टापूर येथे अज्ञात समाज कंठक व्यक्तीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक अश्लील शब्दात लिखाण केले. त्यामुळे बौद्ध अस्मिता रक्षण समिती येनापूर यांच्या वतीने परिसरातील बौद्ध बांधवांनी येनापूर येथील बाजारपेठ बंद करून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले.
बौद्ध अस्मिता रक्षण समीतीचे अध्यक्ष मा.काजल मेश्राम मार्गदर्शन करतांंना

त्यावेळी बौद्ध अस्मिता रक्षण समीतीचे अध्यक्ष मा.काजल मेश्राम , मा.राजु रामटेके उपाध्यक्ष मा.प्रितम घोणमोडे सचिव मा. मंगलदास चापले प्रवक्ता मा .अँड.डुमेश राऊत सल्लागार सहसचिव राकेश कुरखेडे मा.निनाद देठेकर ,मा.परीजन दहिवले संघटक मा.प्रमोद उमरे संघटक मा.संतोष मेश्राम मिडिया प्रमुख मा.अरुण कुकुडकर मा.नामदेव मेश्राम मा.जितु झाडे, रोशन गेडाम ,सुनील गोवर्धन ,जयसुक गेडाम ,गौतम मेश्राम ,हर्षल उराडे ,नेवाजी मेश्राम ,पुरुषोत्तम मेश्राम ,किशोर कुकुडकर ,बाळू निमसरक ,पुरूषोत्तम उंदिरवाडे ,बाबुराव अलोने देवानंद दुर्गे ,हमखास रामटेके ,दिनेश उराडे, विविक उराडे ,युगेश उराडे, नानाजी राऊत ,सरीता उंदिरवाडे ,जया रामटेके ,सारीका मेश्राम ,अल्का रामटेके ,सविता चापले ,शितल अवथरे ,साधना निमसरकर येनापूर परिसरातील बौद्ध बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. व पोलीसांचा चोख यावेळी कडेकोट बंदोबस्त होता.
