निसर्गाने केला घात …प्रशासन देईल का मदतीचा हात ! चक्रीवादळामुळे महेंद्र जैराम राऊत यांच्या घरावरील पत्रे उडाले …
मुख्य संपादक संतोष मेश्राम

चक्रीवादळामुळे महेंद्र जैराम राऊत यांच्या घरावरील छत उडाले …
येनापुर येथील घटणा .
निसर्गाने केला घात …प्रशासन देईल का मदतीचा हात !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली / चामोर्शी .
दि.1/7/24.
येनापुर
चामोर्शी तालुक्यातील येनापुर येथील महेंद्र जैराम राऊत यांच्या घरावरील संपूर्ण छत चक्रीवादळामुळे उडवुन नेल्याची घटणा आज दिनांक 1/7/24 ला रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली.
त्यांना 2020 21 मघ्ये घरकुल मिळाले होते .घरकुलचे काम करुन घरावर एलवेश्टर टाकले होते आणि तिथेच आपले कुटुंबाला घेऊन वास्तव करीत होते .तसेच संपूर्ण घरातील संसार उपयोगी साहित्य सुद्धा नासधुस झाली आहेत त्यामुळे खुप मोठे नुकसान झाले आहे . निसर्गाने केला घात शासन देणार का मदतीचा हात ,याकडे लक्ष लागले आहे.त्यामुळे शासनाकडून आथिँक मदत मिळावी अशी अपेक्षा महेंद्र राऊत यांनी माहिती केली आहे.