Breaking
येनापुर

एस सी-एस टी च्या आरक्षण बचाव करीता  येनापुर आज कडकडीत बंद…..

मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

 

एस सी-एस टी च्या आरक्षण बचाव करीता  येनापुर आज कडकडीत बंद…..

 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज 

 

 

दिनांक 21 8/24.

येनापुर

आरक्षण बचाव च्या करीता आज येनापुर येथे सामाजिक कार्यकर्ते अँड दिनेश राऊत ,प्रमोद उमरे ,आनंद गोडबोले ,प्रितम घोणमोडे,प्रेमानंद गोंगले , मंगलदास चापले , हरीदास टेकाम ,शांताराम शिडाम ,जितु झाडे,मुन्ना गोंगले ,रोशन गेडाम ,दिपक गोंगले ,दिलीप नेवारे ,सुनील गोर्वधन ,कीँतीमंतराव मडावी, रामदास तोरे,शामराव मडावी, बालाजी आकेवार , केशव गोंगले, मारोती अवथरे, रोशन गेडाम ,वनदेश दुर्गे ,मनोहर दुर्गे ,राकेश कुरखेडे,नेवाजी मेश्राम ,किरण दुधे,नयन डोंगरे ,गपीनाथ कोवे ,सुभाष मडावी, मिलिंद राउत ,वेदांत उमरे ,आदिश अवथरे,सम्यक गेडाम ,पराग गेडाम ,सोहिल गेडाम ,शुभम गोंगले ,साहिल दुधे ,तसेच संपूर्ण येनापुर परीसरातील जनता मोठ्या संख्येने सहभागी होउन आंदोलनाला समर्थन केले. असुन दि २१ ऑगस्टला येनापुर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले.

 

अनु.जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरण व क्रिमिलेअर बाबतीत मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तात्काळ रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने संसदिय कायदा पारित करावा. आरक्षणाचे अबकड गट पाडण्यात येवू नये, कारण ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमाने विविध जातीतील लोकांना एकत्र आणून गुलामी नष्ट केली परंतु या निर्णयाने फूट पाडून पुन्हा गुलामित टाकण्याचा प्रयत्न होत आहे असेही अँड.दिनेश राउत सामाजिक कार्यकर्ते यांनी पत्रकाराशी बोलताना म्हटले ,आमचा लढा राजकीय नसुन सामाजिक आहे. व शाळा ,महाविद्यालय व बाजार पेठ बंद केले. समाजाचे आरक्षण टिकले पाहिजे त्यासाठी राजकीय बाजु दुर ठेउन एस.सी.एस.टी.च्या लोकांनी एकत्र आले पाहिजे. आपले हित लक्षात घेता संविधानाचे उल्लंघन होउ नये बाबा साहेब आंबेडकरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण लढा देत राहु । आरक्षणाची ही बाब लक्षात घेता असैविंधानिक आहे .जाती जातीमध्ये भेद निर्माण करून फोडा आणि राज्य करा हि रणनीती दिसते.त्यामुळे एस.सी.एस.टि. लोकांनी ओळखुन जाग झाल पाहिजे त्यासाठी सर्व मिळुन समर्थन केले आहे.

 

 

तसेच येनापुर परीसरातील सर्व जनता सामाजिक कार्यकर्ते मिळुन भारत बंद व येनापुर कडकडीत बंद ठेवण्यात आले.

सदर होवू घातलेल्या येनापुर बंद मधे सर्व अनु. जाती जमातीच्या लोकांनी संघटना व विविध गटातटातील लोकांनी येनापुर बंद साठी मोठ्या संख्येने सहभागी झाले. व येनापुर परीसरातील जनतेचा खुप मोठ्या प्रमाणात पाठिंबा व समर्थन केले.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे