हजारो वर्षापासुन गुलामीच्या जोखडात अडकलेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे क्रांतिसुर्य, मार्गदाता, विश्वरत्न, सिम्बॉल ऑफ नॉलेज, विश्वभूषण , भारतरत्न , महाविद्वान , महानायक , अर्थशास्त्रतज्ञ , महान इतिहासकार , संविधान निर्माता, युगपुरुष , परमपूज्य,बोधिसत्व , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती संपन्न ..
येनापुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोषात साजरी…
गडचिरोली,
येनापुर :-
दिनांक :- 14/4/24.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येनापुर येथे आज दिनांक 14 /4/24.ला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. तेव्हा संपूर्ण बौद्ध उपासक व उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच परीसरातील जनता मोठ्या संख्येने सहभागी होते.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले व त्रिशरण, पंचशीला घेऊन आणि, जय भिम…जय भिम चा जयघोष नारा देत डीजेच्या तालावर बौद्ध उपासक,उपासीका ,युवक युवती नाचत गाजत प्रभात फेरी काढण्यात आली.आणि अशा प्रकारे भिम जयंती साजरी करण्यात आली.