जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांच्या तत्परतेने अतिशय गंभीर असलेल्या महिलेला मिळाले जीवनदान..
आकाश बंडावार

जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांच्या तत्परतेने अतिशय गंभीर असलेल्या महिलेला मिळाले जीवनदान..
जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांच्या तत्परतेने अतिशय गंभीर असलेल्या महिलेला वेळेवर पांढऱ्या रक्त पेशी उपलब्ध झाल्यामुळे त्या महिलेला मिळाले जीवनदान.
गडचिरोली :-
दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी एक 50 वर्षे वय असलेल्या महिलेला सिटी हॉस्पीटल गडचिरोली येथे भरती करण्यात आले होते. शरिरातील पांढऱ्या रक्त पेशी अल्प प्रमाणात असल्यानं त्यांना तात्काळ पांढऱ्या रक्त पेशीची आवश्यकता असल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली त्यानुसार लगेच नातेवाईक यांच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होत. आता करायचं काय अशावेळी संतोष मेकलवार यांनी फोनद्वारे संपर्क करून जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांना माहिती दिली. सदर महिलेची प्रकृती बघता त्यांना तात्काळ पांढऱ्या रक्त पेशीची आवश्यकता होती त्यानुसार लगेच जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील जिल्हा रक्त संकलन केंद्र येथे कार्यरत असलेले डॉ. अंजली साखरे व डॉ. अशोक तुमरेटी यांची भेट घेवून सदर महिलेला वेळेवर काही क्षणांत दोन पिशवी पांढऱ्या रक्त पेशी उपलब्ध करून देण्याची मोलाची भूमिका पार पाडली.
चंद्रपूर जिल्यातील सावली तालुक्यातील राजोली येथील मीराबाई दंडीकवार वय 50 वर्षे, ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह असून सदर महिलेला शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी कमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती अतीशय खालावलेली होती त्यांना लगेच पांढऱ्या रक्त पेशीची गरज भासत होती त्यानुसार नातेवाईकांनी जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार यांच्याशी संपर्क करून मदत करण्याची विनंती केली. जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार व संतोष मेकलवार यांच्या तत्परतेने सदर महिलेला वेळेवर दोन पिशवी पांढऱ्या रक्त पेशी उपलब्ध करून दिली. आणि त्या महिलेची भेट घेवून नातेवाईक यांच्या सोबत चर्चा करून प्रकृतीची विचारपूस केली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एक पिशवी पांढऱ्या रक्त पेशीची आवश्यकता आहे असे डॉक्टरनी सांगितले त्यानुसार ओ पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या रक्तदात्यांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये मयंक मेकलवार व पियूष येलकुचेवार हे दोघेही आलापल्ली येथील असून सद्या पोलिस भरतीची तयारी करीता गडचिरोली येथे आले होते त्यांनी रक्तदान करीता तयार झाले व लगेच जिल्हा रक्त संकलन केंद्र गडचिरोली येथे येवून रक्तदान केले. त्यानंतर दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी एक पिशवी पांढऱ्या रक्त पेशी त्या महिलेला उपलब्ध करून देण्यात आले. अशा प्रकारे एकूण 3 पिशवी पांढऱ्या रक्त पेशीची पूर्तता जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापुर द्वारा संचालित रक्तदाता शोधमोहिम व जनजागृति अभियान जिल्हा गडचिरोली येथील जिल्हा रक्तदुत रवींद्र बंडावार व संतोष मेकलवार रक्तदाता मयंक मेकलवार, पियूष येलकुचेवार यांनी वेळेवर मदत केल्याबद्दल कुटुंबातील नातेवाईकांनी धन्यवाद मानले.
सद्यस्थितीत उन्हाळयाचे दिवस सुरू असल्याने जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासत असते अशा वेळी रक्तदात्यानी रक्तदानाकरीता समोर येवून रक्तदान करावे असे आवाहन जिल्हा रक्तदुत्त रविंद्र बंडावार यांनी केले आहे.