आरोग्य व शिक्षणसोलापूर
धक्कादायक ! दूषित पाण्यामुळे सोलापुरात दोन शाळाकरी मुलींचा मृत्यू ; दोघांची प्रकृती गंभीर
मुख्य संपादक

धक्कादायक ! दूषित पाण्यामुळे सोलापुरात दोन शाळाकरी मुलींचा मृत्यू ; दोघांची प्रकृती गंभीर
सोलापूर
दिनांक 5/4/25.
सोलापूर शहरातील जगजीवन राम नगर मोदी परिसर येथे दूषित पाणीपुरवठ्यामुळे दोन चिमुकलींचा जीव गेल्याची माहिती समोर येत आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिवळसर रंगाचे दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. या वस्तीमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांचे जीव यामुळे धोक्यात आलेले आहेत. यापूर्वी देखील अनेक नागरिकांना जुलाब आणि उलटी याचा त्रास सुरू झालेला आहे.
दुषित पाण्यामुळे त्या मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या भागाला जोडणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये दूषित पाणी मिसळत असल्याचे समोर आले आहे. ड्रेनेजचेंबर मधून पिण्याची पाईपलाईन गेल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले.