
झाला धोका ! देशासाठी हवाई संरक्षण पुरविणाऱ्या कंपनीची गोपनीय कागदपत्रे ,पाकिस्तानला लीक करण्याऱ्यास अटक
भारत /पाकिस्तान .
दि.20/4/25
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानला लष्कराची, संरक्षण संबंधी गोपनिय कागदपत्रे पुरविल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. या प्रकरणाची एकेक कडी जोडत केंद्रीय गुप्तचर संस्था बंगळुरूपर्यंत पोहोचल्या आहेत. भारताची नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या एका कर्मचाऱ्याला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये खळबळ उडाली आहे. दीप राज चंद्रा असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो भेलमध्ये उत्पादन विकास आणि संशोधन केंद्रामध्ये काम करतो.