
बापरे ! आईने आईस्क्रीम खाल्लं म्हणून4 वर्षाच्या लेकाने थेट पोलिसांना बोलावलं
अमेरिका ,
दिनांक 14/3/25.
लहान मुलं जितकी निरागस असतात तितकीच ती खोडकरही असतात. कधीकधी ते त्यांच्या भन्नाट आणि गोड कृतींनी मन जिंकतात, तर कधी ते असा खोडसाळपणा करतात की हसणं थांबवणं अवघड होऊन जातं. त्यांच्या काही गोष्टींमुळे आई-वडिलांची बोलतीही बंद होते. चार वर्षांच्या एका मुलानेही असंच काहीसं केलं आहे, जे समजल्यावर तुम्हालाही थोडा धक्काच बसेल. आईने आईस्क्रीम खाल्लं म्हणून मुलगा नाराज झाला अन् त्याने थेट पोलिसांनाच बोलावलं. अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यात ही अजब घटना घडली आहे.