गुरवळा दलित वस्तीचे सिमेंट रस्ते आठ वर्षा नंतरही आता माहितीच्या अधिकारातुन बोलू लागले…..!!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

गुरवळा दलित वस्तीचे सिमेंट रस्ते आठ वर्षा नंतरही आता माहितीच्या अधिकारातुन बोलू लागले…..!!
गडचिरोली.(दि,19 सप्टेंबर )
कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या
ग्रामपंचायत गुरवळा या ग्रामपंचायतीच्या वतीने सन 2016 ते सन 2017 या कालावधी मध्ये गुरवळा ग्रामपंचायतीने दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन ते तूळशीदास रामटेके यांच्या घरापर्यंत 5 लाख रुपये खर्चून सिमेंट कांक्रेटचे रोड बनविण्यात आले.
तसेच सन. 2017 ते सन2018 या वर्ष्या मध्ये तुलसीदास रामटेके ते देविदास रायपुरे यांच्या घरापर्यंत सिमेंट कांक्रेटचे रोड बनविण्यात आले.आणी मारोती बाबनवाडे, शिवकुमार सेमस्कर यांच्या घरापर्यंत सुधा सिमेंट कांक्रेट नालीचे बांधकाम सुद्धा करण्यात आले होते .
सदर या रस्त्याचे व नालीचे बांधकाम करताना ग्रामपंचायतीने सुद्धा रस्ता व नाली बांधकामाचा ठराव घेवून सर्व ग्रामपंचायत सभासदानी बहुमताने रस्ता मंजुरीला मान्यता देऊन .रस्त्याचे व नालीचे बांधकाम करून दलितवस्ती मध्ये विकासात्मक कामात भर टाकण्यात आली.
ग्रामपंचायती ने केलेल्या विकासात्मक कामाची प्रशासनाने दखल घेऊन शासनाने गुरवळा ग्रापंचायतीला सन्मानीत पुरस्कार देऊन ग्रामपंचायत व ग्रामसेवकांचा गावाकऱ्यानं पुढे सत्कार सुद्धा करण्यात आला.
ग्रामसेवकांनी गावात केलेली विकासात्मक कामे आजही जिवंतपणाची साक्ष देत असताना नागपूर मध्ये वास्तव्य करीत असलेले व पेशाने वकील असलेल्या एका पती पत्नीने आठ वर्षानंतर गावातून बदली झालेल्या एका निष्पाप, निस्वार्थ कर्तबगार ग्रामसेवकाला वकील पती पत्नी ने आठ वर्षा मध्ये सहा ते सात वेळा माहितीचा अधिकार घेवून ग्रामसेवकाला सतत मानसिक व आर्थिक त्रास देण्याचे कामे सुरु केलेले आहे .
सदर एका निष्पाप व निस्वार्थ ग्रामसेवकाची पत्नी ही अनेक दिवसापासून कॅन्सरग्रस्त आजाराने त्रस्त असून ती सुद्धा मृत्यू शयेवर पळून मृत्यूची घटीका मोजत असताना सुद्धा वकील पती पत्नी या दोघांनी ग्रामसेवका कडून सहा ते सात वेळा माहितीचा अधिकारा मागून ग्रामसेवकांची झोपच उडवून त्यांचे अस्तित्व नष्ट करून त्यांना बदनाम करण्याचा व मानसिक त्रास देण्याचा जनू सपाटाच सुरु केलेला आहे.
ग्रावसेवक बारसागडे हे ,वकील पती पत्नी यांच्या जाचाला त्रस्त झालेले असून ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस ढासाळताना दिसत आहे.
वकील पती पत्नी यांच्या आव्हाणाला सामोरं जाऊन ग्रामसेवक बारसागडे हें स्वतः न्यायालयीन लढाई लढाण्याच्या तयारीत असून अखेगाव ग्रामसेवक बारसगडे यांच्या पाठीशी उभे असून प्रसंगी ग्रामसेवकांच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसण्याच्या सुद्धा गावकर्यांनी संकल्प केलेला आहे.
गावाखेड्यत वास्तव्यात असलेले नागपूर सारख्या शहरी भागात जाऊन आपली वकिली वर्चस्व गाजविणाऱ्या वकील पती पत्नीवर गुरवळा येथील गावाकऱ्यांनी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.हा एका निष्पाप ग्रामसेवकांचा बळी तर घेत नसेल ना अशी गावाकऱ्यानी चर्चा सुद्धा सुरु केलेली आहे.