पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी! चोखाजी ढवडे
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी! चोखाजी ढवडे
गडचिरोली.(दि,18 सप्टेंबर
कार्यकारी संपादक :
अनुप मेश्राम
वडसा वनविभागा अंतर्गत येत असलेल्या पोर्ला वनपरीक्षेत्र कार्यालयां अंतर्गत सन 2021, 022, सन 2022, 2023 या वित्तीय वर्षात झालेल्या अनेक कार्यालयीन कामाची माहिती माहितीच्या अधिकारा अंतर्गत मागितलेली असताना सुद्धा वनपरिक्षेत्रअधिकारी पोर्ला यांनी कार्यालयीन माहिती देण्यास टाळाटाळ करून माहिती अधिकारची पायमल्ली करीत असलेल्या वनपरीक्षेत्र अधिकारी पोर्ला यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चोखाजी ढवळे यांनी केलेली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र कार्यालय पोर्ला यांच्या कडून दिनांक 24.04.2023 ला माहितीच्या अधिकाराअंतर्गत केलेल्या कामाची माहिती मागितलेली असताना सुद्धा वनअधिकारी पोर्ला यांनी मागीतलेली माहिती देण्यास हेतूपुरस्पर टाळाटाळ करून सबंधित व्यक्तीची दिशाभूल करताना दिसत आहेत.
प्रथम अपिलय अधिकारी तथा उपविभागीय वनअधिकारी वन विभाग वडसा, यांच्याकडे दिनांक 25.05.2023 ला प्रथम अपील केलेली असता. प्रथम अपिलीय अधिकारी वनविभाग वडसा यांनी दिनांक 12.6.2023. ला आपल्या कार्यालया अंतर्गत अपिलीय सुनावणी ठेवण्यात आलेली असताना सुद्धा वनपरीक्षेत्र अधिकारी पोर्ला यांनी मागितलेली माहिती ऊपलब्ध करून न देता ठेवलेल्या सुनावणीला सुद्धा बेपत्ता असल्याचे दिसून आले.
प्रथम अपील अधिकारी वडसा यांनी दुसऱ्यांदा दिनांक 20.06.2023. ला सुद्धा दुसरी अपील ठेवून त्यांना माहिती उपलब्ध करून देण्याची संधी दिली असताना सुद्धा, दुसऱ्याही अपीलला सुधा वनपरिक्षेत्र अधिकारी हजर न होता दुसऱ्यांदाही बेपत्ता असल्याचे दिसून आले.
प्रथम अपील अधिकारी उपविभागीय अधिकारी वडसा यांनी दिनांक 12/06/२०२३ व 20.06.2023 या दोन दिवशी ठेवलेल्या या दोन्ही आपिलीय सुनावणीला हेतूपूरस्पर बेपत्ता असलेल्या वन अधिकारी यांच्या विरोधात आपिलीय अर्ज निकाली काढून सात दिवसाच्या आत सबंधित तक्रारदाराला विनामूल्य माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश पारित केल्यानंतर सुद्ध सामाजिक कार्यकर्ता चोखाजी ढवढे यांनी कार्यालयीन माहीत उपलब्ध करून दिलेली नाही.
माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी चोखाजी ढवडे कार्यालयाला अनेकदा भेटी देऊन सुद्धा वनपरीक्षेत्र अधिकारी आपल्या कार्यालयीन दिवशी विविध वेळेस बेपत्ता असल्याचे दिसून आले
वन परीक्षेत्र अधिकारी पोर्ला यांना माहितीच्या अधिकारा अंतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळा टाळ करणे,दप्तर दिरंगाई करणे, विना अनुमती कार्यालयात अनुपस्थित राहणे,तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास देणे, नियमाचे काटेकोर पालन न करणे, अश्या निष्क्रिय, कामचुकार वनपरीक्षेत्र अधिकारी यांचेवर शिस्तभांगाची कार्यवाही करून त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्तेचोखाजी ढवडे यांनी केलेली आहे. तसेच त्यांनी तिसरी अपील सुद्धा राज्य माहिती आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्या कडे सादर केलेली असून राज्य माहिती आयोग खंडपीठ होणाऱ्या सुनावणीमध्ये काय निर्णय देतात याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.