अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार पोलिस जागीच ठार…
चामोर्शी
येनापुर दि. 16 /09/ 23
येणापुर प्रतिनिधी
आकाश बंडावार
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चामोर्शी :- चामोर्शी तालुक्यातील अड्याळ आश्रमशाळा समोरील वळणाच्या समोर अज्ञात वाहणाने जबर धडक दिल्याने गडचिरोली येथे कार्यरत असलेले पोलिस शिपाई जागीच ठार झाल्याची घटना घडली .ठार झालेल्या पोलिस शिपाईचे नाव प्रणय ताराचंद वाळके वय 27 वर्ष रा. मुधोली चक नं 2 येथील रहिवासी आहे आणि आपल्या स्व गाहून गडचिरोली ला नौकरी वर स्वताच्या दुचाकीने जात असताना अज्ञात वाहणाने जात असताना जबर धडक दिल्याने पोलिस प्रणय वाळके जागिच ठार झाला.असुन माहिती कळताच आजुबाजुच्या परिसरातील लोकांची गर्दी अपघात पाहण्यास जमली तसेच घटणा स्थळी पोलिस दाखल झाले .तसेच पोलिस शिपाई यांच्या स्वगावी मुघोली चक नं 2 येथे अंत्यसंस्कार आज करण्यात येत आहे. नातेवाईकाकडुन ,गावात , परीसरात हळहळ व्यक्त केले जात आहे .