राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सामदा येथील कॅन्सरग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत…
मुख्य संपादक

राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सामदा येथील कॅन्सरग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत…
दिनांक : ११ सप्टेंबर २०२३.
सावली .
मुख्य संपादक
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
सावली :- जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा माणून राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री,विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार हे कॅन्सरग्रस्त,गरीब लोकांना आर्थिक मदत करतात.ते बाकीच्या राजकारण्यापेक्षा सामाजिक कार्यातील मानबिंदू ठरले आहेत.
सावली तालुक्यातील सामदा बुज येथील मा.अनिल मडावी आर्थिक ह्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला व्याहाड बुज येथे कॅन्सर तपासणी शिबीर चालू असताना आर्थिक मदत देण्यात आली. अनिलजी मडावी हे घरातील कमावते व्यक्ती, गरीब व भूमिहीन शेतमजूर आणी घरी लहान मुले असताना मागील काही महिन्यापासून कॅन्सर या आजाराने ते ग्रस्त आहेत. घरची परिस्थिती बेताची असून पुढील उपचारकरिता मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितिन गोहणे यांना मिळाली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुकाध्यक्ष नितिन गोहने यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते माजी मंत्री,व विद्यमान आमदार लोकनेते श्री.विजयभाऊ वडेट्टिवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत सदर रुग्णाला तात्काळ मिळवून दिली.मदत देताना काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहणे,माजी सभापति पं.स.सावली मा.राकेश पाटील गड्डमवार ,सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर कारडे,नितीन जुवारे,उपसरपंच सामदा, व्याहाड बुजचे माजी सरपंच पितांबर वासेकर, माजी सरपंच सौ.वंदना गुरनुले, ग्रा.पं. सदस्य व्याहाड बुज मा.सुनील बोमनवार,मा.मोहन कुनघाडकर,मा.रुपेश किरमे,मा.अनिल गुरनुले,मा.अनिल पाल,मा.चेतन मोटघरे, मा.रुमाजी कोहळे, मा.जयंत सांगिडवार व आदी काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.