देश-विदेश
महागाईमुळे अमेरिका सोडुन भारतात स्थायिक झाला तरुण ,म्हणतो , ईथे सर्व 80% स्वस्त …!
मुख्य संपादक संतोष मेश्राम .

महागाईमुळे अमेरिका सोडुन भारतात स्थायिक झाला तरुण, म्हणतो , ईथे सर्व 80% स्वस्त …!
अमेरिका ,
दिनांक 25/3/25.
एक अमेरिकन तरुण तिथल्या महागाईला वैतागून चक्क भारतात स्थायिक झाल्याची माहिती समोर आली आहे. इलियट रोझेनबर्ग या अमेरिकन तरुणाने अमेरिकेतील प्रचंड महागाईला कंटाळून भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेच्या तुलनेत गोव्यामध्ये जीवन जगणं खूपच स्वस्त असल्याचं त्याने सांगितलं.
गोव्यामध्ये मी एक लाख रुपयांहून कमी खर्चात आरामदायी जीवन जगतो. अमेरिकेच्या तुलनेत इथे सुमारे ८० टक्के कमी खर्च येतो, असेही त्याने सांगितले. एवढंच नाही तर गोव्यामधील वास्तव्यादरम्यान त्याने एका भारतीय तरुणीसोबत विवाह देखील केला. तो हिंदी भाषाही शिकला. तसेच दोन नवे व्यवसायही सुरू केले.