आरोग्य व शिक्षण
“बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे ” , बारावीचा पहिला पेपर दिल्यावर वैभवी देशमुख भावुक ।
मुख्य संपादक

“बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे “,बारावीचा पहिला पेपर दिल्यावर वैभवी देशमुख भावुक ।
मुंबई,
ही अशी पहिली परीक्षा आहे, जेव्हा बाबा माझ्यासोबत नव्हते. आधी बारावीची परीक्षा देण्याची माझी मानसिकताच नव्हती. प्रत्येक क्षण वडिलांची आठवण येते. बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यासाठी बारावीची परीक्षा देण्याची तयारी केली. मला काहीतरी करून दाखवायचे आहे. त्यामुळे सर्व दु:ख बाजूला सारून बारावीचा पहिला पेपर दिला आणि मानसिकता नसली तरी यापुढील सर्व पेपर चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मृत संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.