जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात महिती अधिकार दिन साजरा
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात महिती अधिकार दिन साजरा..
कार्यकारी संपादक
अनुप मेश्राम
“दणका कायद्याचा डिजिटल न्युज “
गडचिरोली
दि,२७ सप्टेंबर रोज बुधवार ला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात महिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अनुप मेश्राम पत्रकार विचार क्रांती न्युज पोर्टल व साप्ताहिक एकतेची हाक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून
संफिप कांबळे पत्रकार लोकशाही न्युज मराठी पोर्टल चे संपादक हे होते,तर प्रमुख मार्गदर्शक व वक्ते डाॅ.नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विदर्भ अध्यक्ष वाईस इंडिजीयस पिपल फार जस्टिस ॲन्ड पिस या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना गडचिरोली मंचावर उपस्थित होते.
सामान्य नागरिकांना योग्य ती माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये मिळत आहे त्यामुळे हा कायदा प्रभावी असल्याचे मत डॉ.नामदेव खोब्रागडे यांनी व्यक्त केलेले आहे, जिल्हा भूमि
अभिलेख कार्यालय गडचिरोली येथे माहितीचा अधिकार दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
डॉ नामदेव खोब्रागडे माहिती अधिकारा बद्दल विस्तृत माहिती दिली. जन माहिती अधिकारी व प्रथम अपीलीय अधिकारी यांनी करावयाच्या प्रक्रियेवर त्यांनी प्रकाश टाकला. माहितीच्या अधिकारांमध्ये दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. माहिती पुरविणे गोपनीय कारण देता येणार नाही. अपवाद कलम ८ तसेच माहिती विहित मुदतीत पुरविणे. कार्यालयाचे कामकाजाबाबत अधिनियमच्या कलम ४ प्रमाणे कार्यवाही करून प्रवेशद्वारा जवळ माहिती अवलोकनार्थ ठेवावी. त्या माहितीचे सूचना फलक लावावे. कलम ५ प्रमाणे कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात सहाय्यक जन माहिती अधिकारी, जन माहिती अधिकारी, प्रथम अपील अधिकारी यांचे शाखा कार्य सनाप्रमाणे ठळक अक्षरात माहिती लावावी. तसेच माहिती अधिकाराचा अर्ज कार्यालयात स्वीकारताना सहाय्यक माहिती अधिकारी नियुक्त करावा, आपल्या कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात ठळक दिसेल अशा दर्शनी भागात नियुक्त जन माहिती अधिकारी नावे फलकावर लावाववी. तसेच सर्व माहितीच्या अर्जाचा पत्र व्यवहार व माहिती पुरविणे हे जन माहिती अधिकारी यांनी स्वतः जन माहिती अधिकारी म्हणून करावयाचे आहे.
आपल्या कार्यालयाची माहिती माहितीच्या अर्जातील माहितीच्या खर्चासहित पृष्ठ दोन प्रमाणे व पोस्टाचा खर्च सुरुवातीलाच संबंधितांना कळवणे अतिरिक्त खर्चाचा भरणा करून माहिती अधिकारी यांच्याकडे पावती सादर केल्यानंतरच माहितीच्या छायांकित प्रती करण्याची प्रक्रिया करावी. विचारलेली माहिती ही माहिती अधिकाराशी संबंधित नसेल तर ती योग्य त्या संबंधित माहिती अधिकाऱ्याकडे किंवा सार्वजनिक प्राधिकरणाकडे दोन दिवसात हस्तांतरित करावी तसे अर्जदारास कळवावे पत्र व्यवहार केल्यास पोस्टाच्या पुराव्यासहित कार्यालयात ठेवावी.
आपल्याकडे कार्यालयात येणारे नागरिक हे फार मोलाचे आहेत.नागरिक हे आपल्यासाठी नसून आपण लोकसेवक त्यांच्या सेवेसाठी आहोत.नागरिक हे आपल्या कामामध्ये व्यत्यय नसून ते आपल्या कामाचा गाभा आहेत. असे ही याप्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.
नागरिक कोणी परके नसून ते खऱ्या अर्थाने आपले आधार स्तंभ आहेत.त्याना माहिती पुरवू न आपण उपकार करत नाही.तर सेवा करण्याची संधी देऊन तेच आपण सर्वांना उपकृत करत आहेत.
अनुप मेश्राम पत्रकार यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात आपणाकडून लोककल्याणकारी माहितीचा अधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी कराल अशी अपेक्षा व्यक्त केली आणि अध्यक्षीय भाषणा ला विराम दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक गिजेवार यांनी केले.
या कार्यक्रमाच्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.