जिल्हा महिला बाल रुग्णालयाने घेतला दोन महिलांचा बळी!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

जिल्हा महिला बाल रुग्णालयाने घेतला दोन महिलांचा बळी!
कार्यकारी संपादक -अनुप मेश्राम.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
गडचिरोली.
दि. 28 सप्टेंबर ,
गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयाने प्रसुतीसाठी आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील उज्वला नरेश भुरे वय वर्ष 35 व गडचिरोली शहरातील रंजनी प्रकाश शडमाके वय वर्ष 30 या दोन्ही गरीब, निराधार महिलांचा प्रसुतीने बळी घेतलेला असून या दोन्ही महिलांच्या मृत्यूने शहरांमध्ये हाकाकार माजलेला असून, महिला रुग्णालयात मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
जिल्हा महिला बाल रुग्णायातील निष्क्रिय,सुस्त, बेजबाबदार रुग्णालंय प्रशासनावर अनेकांनी नाराजी व्यक्त करून,, अनेकात प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.
प्रसूती गृहातील डॉक्टरांच्या निष्काळजी,बेजबाबदार व दुर्लक्षपणामुळे दोन्ही निष्पाप महिलांचा बळी गेलेला असून प्रसूतीगृहची जबाबदारी सोपविलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाहिकात केली जातं आहे.