
सावलीत जागतिक कुष्ठरोग निवारण दिन साजरा।…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 30 जानेवारी 2024 ला जागतिक कुष्ठरोग निवारण दिन आणि स्पर्श कुष्ठ रोग जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने सावली तालुक्यामध्ये अलर्ट इंडिया मुंबई, सक्षम कुंष्ठानतेय स्वाभिमानी संस्था नागभीड व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती पर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सावली नगरातून रॅली काढण्यात आली. त्याचप्रमाणे रॅली नंतर समारोपिय कार्यक्रम घेण्यात आला.
त्या कार्यक्रमांमध्ये डॉ.धनश्री मर्लावार तालुका आरोग्य अधिकारी सावली उपस्थित होत्या त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख साहेब ग्रामीण रुग्णालय सावली त्याच प्रमाणे सक्षम स्वाभिमानी कुंष्ठानतेय संस्था नागभीडचे प्रकल्प समन्व्यक संदीप माटे त्याच प्रमाणे बोर्ड मेंबर चौधरी साहेब तसेचधारणे साहेब कुष्ठतंत्रज्ञ् सावली, आरोग्य सहायक आकुलवार साहेब, मिलिंद बारशिंगे कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र सावली आणि इतर सन्माननीय मान्यवर सदर कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलर्ट इंडिया चे सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
त्याच प्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.