शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प — महेंद्र ब्राह्मणवाडे
मुख्य संपादक

शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या , तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प – महेंद्र ब्राह्मणवाडे
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज
दिनांक 01/02/2024.
गडचिरोली :: केंद्र सरकारने आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला हा अर्थसंकल्प असून, यातून सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक शेतकऱ्यांना तोंडाला पाने पुसण्याचा काम करण्यात आलेला आहे. 2047 च्या विकासाचा स्वप्न दाखविल्या जात आहे, मात्र वर्तमानातील सम्यावर दुर्लक्ष केल्या जात आहे.
सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने सर्वसामान्य नागरिकांना शासनाकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांचा हिरमोळ झाला आहे, यातून कुठलाही मोठा फायदा मिळणार नसून ही फक्त आकड्यांची दिशाभूल आहे. रोजगार निर्मिती होईल म्हुणुन फक्त घोषणा केल्या जात आहे मात्र आतापर्यंत किती रोजगार दिले सांगितल्या जात नाही. एकीकडे अर्थमंत्री ग्रामीण भागातील नागरीकांचे उत्पन्न वाढल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे स्वतः च 80 करोड नागरीकांना अन्नधान्य पुरवत असल्याचे सांगत आहे.
यावरुन केंद्र सरकारचा खोटारडेपणा जनतेसमोर येत आहे. भविष्यात आवास योजना अस्तित्वात आणू हे सांगून गरीब नागरिकांना गाजर दाखवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या अर्थसंकल्पनातून अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी स्वतःची व सरकारची पाठ थोपटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.